राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची मोहिम ३ लक्ष १४ हजार रू. चा मुद्देमाल जप्त

 राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची मोहिम

३ लक्ष १४ हजार रू. चा मुद्देमाल जप्त

 

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची मोहिम

३ लक्ष १४ हजार रू. चा मुद्देमाल जप्त

अकोला, दि. ८ : राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने जिल्ह्यात हातभट्ट्यांविरूद्ध मोहिम राबवून ३ लक्ष  १४ हजार रू. चा मुद्देमाल जप्त केला.

मेथेनॉल मिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे सुमारे २० नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना नुकतीच पुण्यात घडली.  अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक सीमा झावरे यांच्या नेतृत्वात २९ मे ते दि.७ जून दरम्यान मोहिम राबविण्यात आली.

कार्यक्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळी पथके तयार करून अनधिकृत हातभट्टी विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या पथकांच्या नेतृत्वात खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.

एकूण गुन्हे प्रकरणांत ३ लक्ष १४ हजार ७२० रू. चा मुद्देमाल जप्त झाला. आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ ई आणि कलम ६५ एफ अंर्तगत कारवाई करण्यात आली. हातभट्टीसाठी वापरण्यात येत असलेला सडवा व वापरण्यात येत असलेले इतर साहित्य जागीच नष्ट करुन राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला मार्फत अनधिकृत हातभट्टी मद्यसेवनाने होणाऱ्या नुकसानांबद्दल नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच अवैध मद्यसेवनाने आरोग्यावर आणि समाजमनावर होत असलेल्या विपरीत परीणामांबद्दल नागरीकांना राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला मार्फत माहीती देण्यात आली.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन