जिल्हाधिका-यांची बार्शिटाकळी येथे भेट विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा




 

जिल्हाधिका-यांची बार्शिटाकळी येथे भेट
  विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा

कामे वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. १९ : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज बार्शिटाकळी येथे भेट देऊन विविध यंत्रणांच्या कामाचा आढावा घेतला. या दौ-यात त्यांनी तहसील कार्यालय, नगरपंचायत, दगडपारवा धरण, तिवसा येथील जनसंवाद कार्यक्रम आदी ठिकाणी भेट देऊन अपेक्षित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.  

जिल्हाधिका-यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. त्यांनी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या चालू निवडणूक कार्यक्रमाचा आढावा घेऊन विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत ऑनलाईन मॅपिंगची पूर्वतयारी तपासली. 'अॅग्रीस्टॅक'  च्या कामाची विचारणा करून शेतकऱ्यांचे प्रलंबित फार्मर आयडी (Farmer ID) त्वरित पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

पुरवठा शाखेला भेट देऊन त्यांनी रेशन कार्डधारक संख्या, धान्य पासिंग आणि पुरवठा प्रणालीच्या ऑनलाईन कामकाजाचे सविस्तर मार्गदर्शन केले. सेतू केंद्राची तपासणी करून त्यांनी शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांचे उत्पन्न आणि जातीचे दाखले विनाविलंब देण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी यांनी बार्शिटाकळी येथील नगर पंचायत कार्यालयास भेट दिली. शहरातील नालेसफाईचे काम पूर्ण करावे. मुदत संपूनही केवळ ६८ टक्के काम झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे काढण्याची संयुक्त कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. दगडपारवा धरणाची पाहणीही त्यांनी केली. पावसाची स्थिती लक्षात घेता पाणी जपून वापरण्याची सूचना केली.

त्याचप्रमाणे, त्यांनी ग्रामीण रूग्णालयातील सुविधांची पाहणी केली आणि नवीन बांधलेली इमारत हस्तांतरित करून घेण्याचे निर्देश अधीक्षकांना दिले. तिवसा बु. येथे जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहून जिल्हाधिका-यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. तेथील पाण्याची समस्या, जलजीवन मिशनचे बंद काम आणि डिजिटल शाळेची मागणी या तक्रारींची तत्काळ चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.  त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला.

 


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन