वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन : अर्ज करण्याचे आवाहन
वृध्द
साहित्यिक व कलावंत यांना मानधन : अर्ज करण्याचे आवाहन
अकोला
दि. 23 : वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन या योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या वर्षाकरिता
ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
योजनेसाठी
पात्र अर्जदार ज्यांचे वय ५० वर्षापेक्षा पेक्षा जास्त आहे (दिव्यांगाना वयोमर्यादा
४० वर्षे राहील) ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे,
ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे, वयाने
ज्येष्ठ असणारे, विधवा / परितक्त्या / दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील.
कलाकाराचे
सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची
उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबू होते,
मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा
राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्गत नसलेले
पात्र कलाकार अर्ज करू शकतात.
कलाकार
/ साहित्यिक हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. प्रस्ताव अर्ज आपले सरकार
पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने वरील प्रमाणे निकषांची पुर्तता करणाऱ्या वृध्द साहित्यिक
व कलावंतानी आपले परिपूर्ण दिनांक १ जुलै २०२६ ते दिनांक ३१ जुलै २०२६ पर्यंत भरावे
असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं) पंचायत विभाग जिल्हा परिषद अकोला यांचे
कडून करण्यात येत आहे.
अर्जासोबत
वृध्द साहित्यिक व कलावंत पती-पत्नीचा एकत्रित पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकारी
यांनी साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC कोड क्रमांक
(साक्षांकित प्रतीसह) जन्मतारखेचा दाखला. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला ग्रामपंचायत/
नगर पंचायत / नगर परिषद महानगरपालिका यांच्या समक्ष अधिकाऱ्यांनी रहिवाशी असल्याबाबतला
दिलेला दाखला किंवा तहसिल कार्यालयाचे रहिवासी अधिवास प्रमाणपत्र तहसिलदार यांचा उत्पन्नाचा
दाखला रोगाबाबत / अपंगत्वाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र,
इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत. अर्जामध्ये
नमुद इतर कलेसंबंधी कागदपत्रे (मागील १५ ते २० वर्षाचे आवश्यक पुरावे सांक्षाकित केलेले
असणे बंधनकारक आहे. आधार कार्ड सत्यप्रत, अर्जदाराचे अर्जासोबत कलाक्षेत्राबाबत परिचय
पत्र तयार करून त्यामध्ये वर्षनिहाय उल्लेखनीय कार्याबाबत उल्लेख करावा व ती सर्व कागदपत्रे
प्रस्तावास लावावीत.
केंद्र शासनाचे / राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त
असल्यास, सांस्कृतिक संचालनालयाकडून पुरस्कार अथवा साहित्यिक असल्यास साहित्य प्रकाशित
झाल्याबाबतचे आवश्यक पुरावे साहित्यिक क्षेत्रात पुरस्कार प्रमाणपत्र प्राप्त असल्यास
अर्जासोबत लावावे.
अर्जदाराने
अर्जामध्ये ज्या कला क्षेत्राचा उल्लेख केला असेल त्या कलाक्षेत्रासंबंधीचे आवश्यक
पुरावे लावावेत. रेडिओ आकाशवाणी या प्रसार माध्यमावर कार्यक्रमाचे सादरीकरण केले असल्यास
त्याबाबतच्या सत्यप्रती, कार्यक्रम सादर केल्याबाबतचे छायाचित्रे कात्रणे त्यामध्ये
अर्जदाराचा कला सादरीकरणाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
कागदपत्रे
पडताळणी तथा सादरीकरण हे पंचायत समिती स्तरावर किंवा जि.प. अकोला स्तरावर घेण्यात येईल.वरील
प्रमाणे निकषांची पुर्तता करणाऱ्या वृध्द साहित्यिक व कलावंतानी आपले परिपूर्ण प्रस्ताव/अर्ज
आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने
दिनांक ३१ जुलै २०२६ पर्यंत सादर करावे, असे आवाहन आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा