स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करा समाजकल्याण कार्यालयाचे आवाहन

 

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करा

समाजकल्याण कार्यालयाचे आवाहन

    अकोला, दि. २३ : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन , निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत:  उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.

            स्वाधार योजनेअंतर्गत काही विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल बाकी असल्यामुळे जे  विद्यार्थी अर्ज सेंड बॅक  करु शकले नाही असे विद्यार्थी सदर योजना लाभापासुन वंचीत राहणार नाहीत या करीता स्वाधार योजनेतील सेंड बॅक  अर्जाची त्रृटीपूर्तता करणेकरीता दि. 7 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.तरी शैक्षणिक सत्र 2024-2025 व 2025-2026 करीता विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमधील सेंड बॅक  अर्जाची त्रृटीपूर्तता लवकरात लवकर करुन स्वाधार योजनेतील इन्स्पेक्टर लेव्हल लॉग-इनला व कार्यालयात सादर करावी.या पत्राद्वारे देण्यात येणारी मुदत ही अंतीम असुन आपल्या लॉगीनमधील अर्जाची त्रृटीपूर्तता तात्काळ करण्यात यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेता येईल, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन