पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' सुशिक्षित युवक- युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी

 

 

पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा'

सुशिक्षित युवक- युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी

अकोला, दि. 24 : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील नामवंत खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात  येत्या २९ जुन, २०२६ रोजी सकाळी १० वा. 'पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

अकोला जिल्हयातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्या मधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र करते. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणा-या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरिता प्रिसीजन मॅपिग जिआयएस प्रा. लि. अमरावती, धुत ट्रान्समिशन लि. छत्रपती संभाजीनगर, अश्पा ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि, नागपूर, क्वेस कॉर्प लिमिटेड, पुणे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बैंक, नागपूर खंडेलवाल ऑटोव्हील्स प्रा. लि., अकोला (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत) केअर हॉस्पिटल कार्डियाक अँड सुपरस्पेशालिटी, अकोला (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत) गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लि. अकोला, (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत). ई आस्थापना / कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.

या मेळाव्यामध्ये गरजू विदयार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी  www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर भेट द्या. एम्प्लॉईमेंट या टॅबवर क्लिक करा. जॉब सीकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी/आधार कार्ड क्र. व पासवर्ड साईन इन करा.  आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडा. डिस्ट्रिक्ट मध्ये अकोला जिल्हा निवडून फील्टर बटनबर क्लिक करावे. नंतर सदर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल त्यासमोर असलेल्या अॅक्कान बटनच्या खाली व्ह्यू व अप्लाय बटन दिसेल. तदनंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल, आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनवर क्लिक करा. आय अॅग्री हा पर्याय निवडा. शेवटी सक्सेसफुली अप्लाईड फॉर द जॉब असा मॅसेज दिसेल. अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवावा. आपली रजिस्ट्रेशन स्लिपची प्रिंट काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे, याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक (०७२४) - २४३३८४९ किंवा Email- akolarojgar@gmail.com यावर संपर्क करा. तसेच २९ जुन २०२६ रोजी शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिवाजी पार्क जवळ, अकोला येथे स्वखर्चान बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या