‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती
योजना - २०२६’
‘आधार’ची माहिती बँकेत द्या : सहकार कार्यालयाचे
आवाहन
अकोला, दि. ३० : राज्यशासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. याचा थेट
लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ‘आधार’ संदर्भातील माहिती बँकेच्या
शाखेत देण्याचे आवाहन जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच, जुलैच्या दुसऱ्या
आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचे सहकार विभागाचे
नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना
सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बॅकर्स समितीकडून
व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे #आधार
क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी सर्व
बँकांकडील पात्र शेतकऱ्यांची कर्ज खात्याची माहिती अपलोड झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र
विशिष्ट कर्ज खातेनिहाय नंबर दिला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, ग्रामपंचायत,
तलाठी कार्यालय आणि पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा