जिल्हा सांख्यिकी कार्यालयात कार्यक्रम प्रशासकीय विदेच्या अचूक वापरातून व्यापक लोकहित साधावे - प्रा. संजय खडककार
जिल्हा सांख्यिकी कार्यालयात कार्यक्रम
प्रशासकीय विदेच्या अचूक वापरातून व्यापक लोकहित साधावे
-
प्रा. संजय खडककार
अकोला, दि. २९ : प्रशासकीय विदेचा योजना व धोरणांसाठी वापर करून त्याआधारे
व्यापक लोकहित साधणे आवश्यक आहे. त्यासाठी सांख्यिकी विभाग व विदा तज्ज्ञांनी योगदान
द्यावे, असे आवाहन तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. संजय खडककार यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त जिल्हा सांख्यिकी कार्यालयात ‘प्रशासकीय
विदेच्या (डेटा) संभाव्य क्षमतेचा वापर’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत
होते. डॉ. उमेश घोडेस्वार, सांख्यिकी उपायुक्त अरविंद सुने, जिल्हा माहिती अधिकारी
हर्षवर्धन पवार, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीमती सदानशिव आदी उपस्थित होते.
प्रा. खडककार म्हणाले की, प्रशासकीय विदा ही केवळ आकडेवारी नव्हे, तर
प्रगतीचे उपाय सुचविणारे साधन आहे. तिचे रूपांतर ज्ञानात व पर्यायाने व्यापक लोकहित
साधण्यात व्हावे.
डॉ. घोडेस्वार म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य, वितरण व्यवस्था, महसूल,
कृषी अशा कितीतरी क्षेत्रातील विदा प्रशासकीय पातळीवर सातत्याने हाताळली जाते. चुकीच्या
डेट्यामुळे विसंगती निर्माण होतात. त्यामुळे परिपूर्ण अंमलबजावणीसाठी अचूक डेटा असणे आवश्यक आहे. श्री. सोनखासकर यांनी प्रास्ताविक केले. श्री. सुने
यांनी आभार मानले.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा