कुष्ठरूग्ण शोधमोहिमेला जिल्ह्यात प्रारंभ
कुष्ठरूग्ण शोधमोहिमेला जिल्ह्यात प्रारंभ
अकोला, दि. १ : राज्यात सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण प्रसाराचे
उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतर्फे जिल्ह्यात
कुष्ठरूग्ण शोध मोहिमेचा प्रारंभ झाला.
जिल्ह्यातील मागील पाच वर्षांमध्ये एकही कुष्ठरुग्ण आढळून न आलेल्या
५११ गावांमध्ये विशेष घरोघर सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत
एकूण ४ लाख ४ हजार ८६३ लोकसंख्येची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले असून आरोग्य
कर्मचारी घरभेटी देत नागरिकांची कुष्ठरोगासंदर्भात तपासणी करीत आहेत. कुष्ठरोगाबाबत
जनजागृती करून रोगाची लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येत
आहे.
सर्वेक्षणादरम्यान आतापर्यंत ४२८ संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली
आहे. त्यापैकी ४ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात
आले आहेत. वेळेत निदान व उपचारामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होत असल्याचे आरोग्य
विभागाने स्पष्ट केले आहे.
या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक
घरातील सदस्यांची शारीरिक तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे लपलेले किंवा निदर्शनास
न आलेले रुग्ण शोधून काढण्यास मदत होत आहे
शासनाच्या २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण प्रसाराच्या उद्दिष्टानुसार
अकोला जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असून या मोहिमेत अपेक्षित यश मिळत आहे.
आगामी काळातही सर्वेक्षण, जनजागृती आणि उपचार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जिल्ह्यातील
कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहेत, असे सहाय्यक संचालक
(कुष्ठरोग) डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. सीईओ अनिता मेश्राम, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्या मार्गदर्शनात मोहिम
सुरू आहे.
०००
यदि पेशंट गंभीर बीमारी से झुंझ रहा हो और वह गरीबी के कारण अपना इलाज प्रायवेट अस्पताल में पैसा देकर नहीं कर सकता,,क्योंकि गरीबों को दो वक्त की रोटी बड़ी मुश्किल से नसीब होती है,, तो वे अपना ऑपरेशन संबंधित इलाज पैसा देकर प्रायवेट अस्पताल में कैसे कर पाएंगे,,इसलिए राज्य सरकार ने गोर गरीबों को बड़े बड़े हस्पतालों में 5लाख तक का इलाज मुप्त में मुहैया करवाने का वादा किया है,,,परन्तु यह पूरी तरह सत्य नहीं है,,,बड़े बड़े डॉक्टर गरीबों की गरीबी का फायदा उठाते हैं,,उन्हें अपने मीठे मीठे बातो में फंसाकर सबकुछ बताने दिखाने के बाद भी,,,पेशंट का इलाज करवाने के लिए देरी लगा देते हैं,उसे साफ साफ बताने में देरी करते हैं. ,इसी को देखते हुए कई गरीब लोग सावकारो से उधार पैसा लेकर ब्याज से पैसा लेकर ,,अपना इलाज प्रायवेट हस्पतालों में मजबूरन करते हैं, ,क्या यही है स्वस्थ भारत सुखी भारत सुंदर भारत सशक्त भारत,,,फिलहाल मेरे साथ भी ऐसा हुआ है,,मेरे पिता को अन्न नलीका ऑपरेशन बताया गया था,,और मेरे पास पैसा नहीं था इसलिए,मैने भी 50हजार रु ब्याज से लेकर अपने पिताश्री को डॉक्टर सोमाने के यहां मजबूरन एडमिट किया,,,,मेरे लिए ऐसा करना जरूरी था,,,,जय श्री राम 🙏
उत्तर द्याहटवा