प्रतिबंधित पदार्थाविरोधात’एफडीए’ची कारवाई
प्रतिबंधित पदार्थाविरोधात ’एफडीए’ची कारवाई
अकोला, दि. २३ : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री विरुध्द धडक मोहीम राबविण्यात येत असुन गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी व तत्सम तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादन, साठा, वितरण व विक्री यावर सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
त्यानुषंगाने अन्न व औषध प्रशासन, अकोला पथक प्रतिबंधीत अन्न पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगे तेल्हारा शहरात एक चार चाकी वाहन प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा विक्री करीता घेऊन येत आहे. त्याअनुषंगे पोलीस स्टेशन हद्दीत माळेगाव तेल्हारा रोडवर गस्त घालत असतांना माहिती प्रमाणे एका चार चाकी वाहनाची थांबवुन तपासणी केली असता त्यात रु. ६,१९,४८४/- किंमतीचा गुटखा पान मसाला साठा आढळुन आला.
वाहन चालक श्री. देवीलाल सज्जनलाल जैसवाल, वय ३३ वर्षे रा. लाडणापुर ता. संग्रामपूर जि. बुलढाणा व इतर २ यांचे विरुध्द पोलीस स्टेशन तेल्हारा येथे भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ व अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम ५९ नुसार आरोपीविरुध्द प्रथम खबरी अहवाल क्र. ४३२/२०२६ दि. २२/०६/२०२६ पो. स्टे. तेल्हारा जि. अकोला येथे दाखल केला असुन प्रतिबंधीत अन्नपदार्थ वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली गाडी MH 40 AC 5047 अंदाजे किंमत रु. ५,००,०००/- जप्त करुन असा एकुण मुद्देमाल रु. ११,१९,४८४/- पोलीस स्टेशन तेल्हारा यांचे ताब्यात दिले.
सदरची कारवाई श्री. दे. गो. वीर, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. र. द्या. सोळंके, श्री. कि. ह. बोरचाटे व श्री. सं. ए. सुर्यवंशी अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अमरावती विभाग यांनी केली.
प्रशासनातर्फे यापुढे देखील गुटखा, पानमसाला इ. प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुध्द कठोर कारवाई घेण्यात येणार आहे.
---


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा