शासकीय आयटीआय : प्रवेशासाठी २१ जूनपूर्वी अर्ज करा

 

शासकीय आयटीआय : प्रवेशासाठी २१ जूनपूर्वी अर्ज करा

 

अकोला दि. १६ : सम्राट चंद्रगुप्त मौर्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभियांत्रिकी तथा बिगर अभियांत्रिकी व्यवसायांच्या एकूण  ८८८ जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी २१ जूनपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन प्राचार्य संतोष साळुंखे यांनी केले.

संकेतस्थळ admission.dvet.gov.in वर प्रवेश अर्ज दाखल करून तो संस्थेमध्ये येऊन निश्चित करावा आणि मग नंतर विविध अभियांत्रिकी तथा बिगर अभियांत्रिकी  ट्रेड निवडून तसा पर्याय अर्ज भरावा, असे संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख अरविंद पोहरकर यांनी सांगितले.

प्रवेश अर्ज दाखल करण्यास किंवा काही तांत्रिक अडचणी असल्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे संपर्क साधावा असेही प्रवेश प्रमुख विनोद पायघन यांनी सांगितले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन