भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रीविरोधात ‘एफडीए’ची कारवाई


 भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रीविरोधात ‘एफडीए’ची कारवाई

दोन ठिकाणी दूध साठा जप्त

अकोला दि. १६ : भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनातर्फे मोहिम राबविण्यात येत आहे.

सहायक आयुक्त दे. गो. वीर यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी र. द्वा. सोळंके यांनी 16 जून रोजी चोहोट्टा बाजार येथील श्रीकृपा दुध डेअरी आणि स्वीट मार्ट या पेढीची तपासणी केली. त्यात दुधात भेसळीच्या संशयावरून ३३ लीटर साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत २ हजार ३१० रू. आहे. त्याचप्रमाणे, १० जून रोजी गोरक्षण संस्थानसमोरील माऊली दुध डेअरीची तपासणी करण्यात आली. त्यात दुधात भेसळीच्या संशयावरून ७ लीटर साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ४९० रू. आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन