शासकीय निवासी शाळा गोरेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
अकोला, दि. 3: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, गोरेगाव खुर्द (ता. व जि. अकोला) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वर्ग ६ वीमध्ये नवीन प्रवेश तसेच वर्ग ७ वी ते १० वी मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश सामाजिक आरक्षणानुसार करण्यात येणार असून त्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थिनींसाठी ८० टक्के, अनुसूचित जमातींसाठी १० टक्के, विजाभज प्रवर्गासाठी ५ टक्के, दिव्यांग विद्यार्थिनींसाठी ३ टक्के आणि एसबीसी प्रवर्गासाठी २ टक्के आरक्षण राखीव आहे.
प्रवेशास इच्छुक पालक व विद्यार्थिनींनी अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक किंवा संबंधित शाळेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा