पेरणीची घाई नको; घरचे बियाणे वापरा कृषी विभागाचा सल्ला
पेरणीची घाई नको; घरचे बियाणे वापरा
कृषी विभागाचा सल्ला
अकोला, दि. १ : येत्या खरीप
हंगामामध्ये अल-निनो च्या पार्श्वभूमीवर कमी व असमान पावसाचा अंदाज असून
मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. 100 मी.मी
पाऊस झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बाजारातील महागडे सोयाबीन बियाणे न वापरता
स्वतःजवळील घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊन बीजप्रकिया करून बियाणे म्हणून वापर करावा. सोयाबीन
पिकाची पेरणी रुंद वरंबा व सरी पद्धतीने (बीबीएफ) किंवा बेडवर टोकन
पद्धतीने केल्यास बियाण्याची बचत होऊन अधिक उत्पादनाची हमी असते. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा