वसतीगृहामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू
वसतीगृहामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू
अकोला, दि. 22 : शैक्षणिक सत्र २०२६-२७ करीता मुर्तिजापूर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियाकरिता वसतीगृहातील रिक्त जागेवर मागील वर्षाच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. इयत्ता ८ वी, इयत्ता ११ वी, डिप्लोमा प्रथम वर्ष, पदवी प्रथम वर्ष, पदव्युत्तर पदवी प्रथम वर्ष व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्ष इत्यादी करिता प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज www//swayam.mahaonline.gov.in या वेबसाईटवर परिपुर्ण भरून त्या अर्जाची प्रत व सोबत लागणारे कागदपत्रे वसतीगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. नमुद कागदपत्रे सोबत जोडण्यात यावे.महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईट, शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता ७/१० वी ची गुणपत्रिका, सन २०२६-२७ चा उत्पनाचा दाखला तहसिलदार यांचा, स्वतःचा जातीचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिका, शासकीय रूग्नालयाचे वैद्यकिय प्रमाणपत्र, आधार कार्ड, स्वत:चे बँक पासबुक, स्वतःचे ३ पासपोर्ट साईज फोटो नमुद सर्व कागदपत्रे अनिवार्य आहेत. सदर अर्ज वसतीगृहात कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा