परवाना नसलेल्या डेअरीवर कारवाई

 

 

परवाना नसलेल्या डेअरीवर कारवाई

अकोला, दि. १८ : बोरगाव मंजू येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत एका डेअरीकडे परवाना नसल्याचे आढळल्याने विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनात भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. बोरगाव मंजू येथील शेतकरी दूध डेअरी येथे तपासणी करण्यात आली. तेथील दूध व दह्याचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून, प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. ही आस्थापना नोंदणीधारक नसल्याने विक्री बंदचे आदेश देण्यात आले.

नागरिकांना शुद्ध व सुरक्षित अन्न उपलब्ध व्हावे म्हणून तपासण्या नियमितपणे करणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांनी सांगितले.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन