विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश किंवा पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना लाभ घेण्याबाबत

 विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश किंवा पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना लाभ घेण्याबाबत

अकोला, दि.22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला कार्यालयाच्या अधिनस्त वाशिम व बुलढाणा या तीन जिल्ह्यातील सर्व 16 शासकीय आदिवासी मुला/मुलींच्या वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी किंवा पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्व अनुसूचित जमातीच्या वि‌द्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, सन 2026-27 या शैक्षणिक सत्रातील लाभ घेणे करीता ऑनलाईन प्रणाली वर नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज भरणेकरीता संकेतस्थळ कार्यान्वीत झाले आहे. तरी //swayam.mahaonline.env.in या संकेतस्थळावर विहीत मुदतीत ऑनलाईन अर्ज भरण्यात यावे.
विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी थेट स्वतंत्र अर्ज करता येणार नाही. जर विद्यार्थ्यांची निवड वसतीगृह योजनेसाठी झाली नाही तरच विदयार्थ्याला स्वयंम योजनेत वर्ग केले जाईल. वसतीगृहात गुणवत्ता यादीव्दारे निवड झाल्यास विद्यार्थ्यांनी जर वसतीगृहातील प्रवेश निश्चित केला नाही किंवा अर्ज रद्द करुन घेतला तर विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेचाही लाभ मिळणार नाही.
अभ्यासक्रम : प्री मॅट्रीक, ज्युनिअर कॉलेज, डिप्लोमा, ग्रॅज्युऐशन, पोस्ट ग्रॅज्युऐशन, प्रोफेसनल अभ्यासक्रमात प्रवेशीत असलेले अनुसूचित जमातीचे वि‌द्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे : वि‌द्यार्थ्यांनी अर्ज भरणे करीता 1) संपूर्ण आधार कार्ड 2) जातीचा दाखला, आवश्यक त्या अभ्यासक्रमाकरीता जात वैधता प्रमाणपत्र ३) महाविद्यालयाची प्रवेश पावती आणि बोनाफाईट सर्टिफिकेट, शैक्षणिक खंड असल्यास गॅप सर्टिफिकेट, 4) वसतीगृह प्रवेशासाठी असल्याबाबत शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र 5) पालकांचा उत्पन्नाचा दाखला, 6) बँक पासबुक 7) मागील वर्षाचा परिक्षेचा निकाल मार्कशीट महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र 8) टी.सी. इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
वि‌द्यार्थ्यांना योजनेबाबत वर नमुद केलेल्या संकेतस्थळावर शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व कालमर्यादा सर्व वि‌द्यार्थ्यांना बंधनकारक राहील. तेव्हा अनुसूचित जमातीच्या सर्व वि‌द्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश किंवा पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार ग. व्यवहारे यांनी केले आहे. अधिक माहिती करिता आपल्या जवळच्या शासकीय आदिवासी मुला/मुलीच्या वसतीगृहाशी संपर्क करावा.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन