जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण जिल्ह्यात १०० टक्के घरगणना पूर्ण

 जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण

जिल्ह्यात १०० टक्के घरगणना पूर्ण

अकोला, दि. १२ : राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात अकोला जिल्ह्याने   घरगणनेचा टप्पा पूर्ण केला आहे. जिल्ह्यात  घरगणनेचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. 

प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात घरगणनेची प्रक्रिया परिपूर्ण नियोजन, जलद गतीने व समन्वय ठेवून  राबविण्यात आली. जिल्ह्यात १४ चार्ज अधिका-यांच्या नेतृत्वात गावोगाव प्रगणक (गणक) कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात एकुण २ हजार ३९९ घरगटांचे काम मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर पुर्ण करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, घरात उपलब्ध असलेल्या सुविधा (उदा. पिण्याचे पाणी, वीज, शौचालय) आणि मालमत्ता यांची नोंद मोबाईल ॲपद्वारे (डिजिटल पद्धतीने) करण्यात आली.  कुलूपबंद घरे किंवा काही अडचणींमुळे राहिलेल्या घरांचे सर्वेक्षण फेरतपासणी करून पूर्ण करण्यात आले. उन्हातान्हात फिरून कर्मचा-यांनी माहितीचे संकलन केले व जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी सर्व चार्ज अधिकारी व जिल्ह्यातील संपूर्ण चमूचे अभिनंदन करून त्यांना जनगणनेच्या पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

  • घरगणना मोहिमेत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण(महानगरपालिका क्षेत्र वगळून) क्षेत्रात एकूण ४,०९,२४६ इतक्या घरांची नोंद करण्यात आली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन