जिल्हाधिका-यांची तेल्हारा येथे भेट विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा
जिल्हाधिका-यांची तेल्हारा येथे भेट
विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा
अकोला, दि. ११ : नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सजग राहून प्रत्येक तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. मान्सूनच्या अनुषंगाने आवश्यक बाबींची वेळीच पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले.
जिल्हाधिका-यांनी आज तेल्हारा येथे भेट देऊन विविध यंत्रणांचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार महेश रामगुंडे, कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपअभियंता श्री. भांगडिया यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दौ-यात मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला. त्यांनी वाण प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची क्षमता, उपलब्ध पाणी साठा, दरवाजे खुले करण्याची प्रक्रिया व कॅचमेंट एरिया आदी विविध बाबींची माहिती त्यांनी घेतली. कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे उपस्थित होते. तेथील रेल्वेच्या कामाचीही पाहणी त्यांनी केली.
तहसील कार्यालय येथे भेट देऊन त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधला व अधिका-यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या. तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन त्यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. रूग्णालयात आवश्यक साधनसामग्रीबाबत प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर त्यांनी क्रीडा संकुलाची पाहणी करून आवश्यक ती कामे सुचवण्यासंदर्भात निर्देश दिले.
०००

.jpeg)
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा