पद्म पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव मागविले
पद्म पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव मागविले
अकोला, दि. ३ : भारत सरकारच्या
गृह मंत्रालयामार्फत देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी असलेल्या पद्मविभूषण, पद्मभूषण
व पद्मश्री पुरस्कारांसाठी नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
हे पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये
उल्लेखनीय, उत्कृष्ट व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतात.
कला, साहित्य व शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य, विज्ञान व अभियांत्रिकी,
नागरी सेवा, व्यापार व उद्योग तसेच इतर विविध क्षेत्रांतील असामान्य योगदानाची दखल
घेऊन हे पुरस्कार दिले जातात.
अकोला जिल्ह्यातील पात्र
व्यक्ती, संस्था तसेच नागरिकांनी योग्य उमेदवारांची नामांकने विहित नमुन्यात सादर करावीत.
पद्म पुरस्कारांसाठीची नामांकने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वर
ऑनलाईन पद्धतीने अपलोड करणे आवश्यक आहे.
इच्छुकांनी आपली नामांकने
दि. १५ जूनपर्यंत पोर्टलवर सादर करावीत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा