बाळापुरात प्रतिबंधित पान मसाला जप्त ‘एफडीए’ची कारवाई

 

बाळापुरात प्रतिबंधित पान मसाला जप्त

‘एफडीए’ची कारवाई

अकोला, दि. ९ : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी बाळापूर येथील कारवाईत १५ हजार रू. किमतीचा प्रतिबंधित पान मसाला जप्त केला.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात मोहिम सुरू आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात गुटखा, पान मसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण व विक्री विरोघात मोहिम राबवली जात आहे.

बाळापूर येथे पथकाने पप्पू पान बहार सेंटरवर छापा मारून १५ हजार रू. किमतीचा पान मसाला जप्त केला, तसेच आस्थापनामालकाविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला.

यापुढेही प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी जोरदार मोहिम राबविणार असल्याचे सहायक आयुक्त दे. गो. वीर यांनी सांगितले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन