बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु


           अकोला,दि. 26 (जिमाका)- सामाजीक न्याय विभागांतर्गत असलेले बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय मुलांचे ऑनलाईन प्रवेश सुरु झाले आहे. शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वर्ग आठवी ते पदवी पर्यंत शिक्षण घेत असलेले तसेच बाहेर गावच्या  विद्यार्थ्यांना टक्केवारीनुसार व शासनाच्या निर्देशाप्रमाणे वसतीगृहात रिक्त असलेल्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरू आहे. वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची, नास्ता  जेवणाची मोफत सुविधा पुरविण्यात येईल.  तसेच स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, मासीक निर्वाह भत्ता व अभ्यासकरीता सोईसुविधा दिल्या जाईल. प्रवेशासाठी विद्यार्थांने app.eprashasan.com/onlineadmission/hostel या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीकरीता गृहपाल के.एम. तिडके (मो.न. 8308058833) व कनिष्ठ लिपीक जी.एन. राठोड यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त व बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल के. एम. तिडके यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ