अकोला (पूर्व) व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघ पुनरिक्षण कार्यक्रम

 अकोला, दि.२८(जिमाका)-भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर  आधारीत अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मतदारांनी नावे नोंदविणे, वगळणे, केंद्र बदल इ.  कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देऊन करता येतील अथवा ऑनलाईन पद्धतीने करता येतील असे मतदार नोंदणी अधिकारी अकोला(पूर्व) विधानसभा मतदार संघ डॉ. शरद जावळे व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघ श्रीमती अनिता भालेराव यांनी कळविले आहे.

पुनरिक्षण कार्यक्रम याप्रमाणे-शुक्रवार दि.२१ जुलै ते सोमवार दि.२१ ऑगस्ट  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी / पडताळणी. मंगळवार दि.१७ ऑक्टोबर एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, मंगळवार दि.१७ ऑक्टोबर ते गुरुवार दि.३० नोव्हेंबर दावे हरकती स्विकारण्याचा कालावधी, मंगळवार दि.२० डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे, शुक्रवार दि.५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.

ही मोहिम मतदान केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत राबविण्यात येईल. या मोहिमेत मतदार मतदार यादीत नाव नोंदणे (अर्ज नमुना क्रमांक ६), १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष पूर्व करणाऱ्या मतदारांची नोंदणी करणे, मयत वा स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे वगळणे (अर्ज नमुना क्रमांक ७), मतदारांच्या मतदार यादीतील तपशील, मतदार ओळखपत्रातील मजकुरात दुरुस्ती करणे( अर्ज नमुना क्रमांक ४) , पत्त्यातील बदल (अर्ज नमुना क्रमांक ५), मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करणे(अर्ज नमुना क्रमांक ६-ब), मतदार ओळखपत्र गहाळ झाले असल्यास नविन ओळखपत्रासाठी विनंती करणे (अर्ज नमुना क्रमांक ८) ही कामे केली जातील.

हे सर्व अर्ज भारत सरकारच्या https://voters.eci.gov.in/  या संकेतस्थळावर भरता येतील किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील. मतदार यादीत आपले नाव शोधण्याकरीता https://electoralsearch.eci.gov.in/  या व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या https://csselection.maharashtra.gov.in/scarsh/ या संकेतस्थळांचा वापर करावा.

मतदारांनी या पुनरिक्षण कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ