डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; 14 जुलै पर्यंत मुदतवाढ


अकोला, दि.23(जिमाका)-  अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनातर्गंत लाभ दिला जातो. सन 2022-23 वर्षाकरिता या योजनेचा लाभ घेण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली असून दि. 14 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तरी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाव्दारे संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये रक्कम थेट जमा करण्यात येते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे सन 2022-23 मधील अर्ज दि.31 मार्च, 2023 पर्यंत क्षेत्रीय स्तरावर या कार्यालयात स्विकारण्यात आलेले आहे. तथापि, विविध संघटना, पालक, विद्यार्थी यांचेमार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून गरजू विद्यार्थी वंचित राहु नये, यासाठी योजनेअंतर्गत सन 2022-23 मधील विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याची मुदत वाढविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मूळ जिल्ह्याच्या ठिकाणीच्या पाच किंमी अंतरावर असलेल्या विविध स्तरावरील महाविद्यालयात किंवा शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 10 वी, 12 वी,  पदवी, पदविका परीक्षेमध्ये 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तीन टक्के आरक्षण असेल. दिव्यांग अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील.  पात्र इच्छूक अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी समाजकल्याण कार्यालय, अकोलाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ