आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम


अकोला, दि.19 (जिमाका)- भारतीय योग संस्था, दिल्ली यांच्यामार्फत बुधवार दि. 21 जून रोजी नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस शहरातील विविध ठिकाणी सकाळी सहा ते साडेसात वाजे दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी मोठ्या संख्येने आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय योग संस्था अकोला कार्यकारणीचे जिल्हा प्रधान राजेंद्र लाडखेडकर यांनी केले आहे. 

            या ठिकाणी साजरा होणार योग दिवस: जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस वसाहत हॉल निमवाडी अकोला, आरडीजी ज्युनियर अँड सिनियर कॉलेज मुर्तिजापूर रोड अकोला, इन्स्टिट्युट फॉर चार्टर्ड अकाऊंट तोष्णीवाल लेआऊट अकोला, व्हि.एच.बी. गार्डन योग साधना केंद्र गोररक्षण रोड अकोला, रामनगर गार्डन योग साधना केंद्र अकोला व मूकबधिर स्कूल जठारपेठ अकोला येथे योग दिवस साजरा करण्यात येणार आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ