नशामुक्त भारत पंधरवाडा; ग्रामिण भागात पथनाट्यव्दारे केले जनजागृती




अकोला,दि.26(जिमाका)-  जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाव्दारे नशामुक्त भारत पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या अभियानाची जनजागृती व्हावी याकरिता कलापथकाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. शाहिर मधुकर नावकार आणि त्यांचा संच यांच्याव्दारे ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालयाचे नोडल अधिकारी संतोष आडे यांनी दिली.

            ग्रामिण भागातील नागरिकांना नशांच्या दुष्यपरिणामाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दि. 12 ते 26 जून दरम्यान कलापथकाव्दारे जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी पथनाटय, भारुड, लोकगीत अशा विविध माध्यमातून नागरिकांना व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. तसेच यावेळी समाजकल्याण कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याव्दारे नशांच्या दुष्यपरिणामाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ