उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला येथे आगमन व स्वागत

 



अकोला, दि.१८(जिमाका)- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सायं. ६ वा. सुमारास शिवनी विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे समवेत विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानपरिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ.प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे आदी उपस्थित होते.प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्यांचे स्वागत केले. उपविभागीय अधिकारी शरद जावळे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, सहायक नियोजन अधिकारी सुनिल देशमुख तसेच अन्य विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा