जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन; द्रवनत्र व द्रवनत्रपात्रे वाहतूकीसाठी निविदा मागविल्या


अकोला, दि.22(जिमाका)- जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन विभागामार्फत अकोला जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये द्रवनत्र पात्रांची वाहतूक करण्याकरीता निविदा मागविण्यात आले आहे. निविदा बाबतचे नियम, अटीशर्ती व अर्जाचा नमूना पशुसंवर्धन कार्यालयामध्ये उपलब्ध असून 1 हजार रुपये शुल्क भरुन दि. 26 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन घ्यावा. तसेच निविदा बुधवार दि. 28 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्विकारण्यात येईल. तर निविदा गुरुवार दि. 29 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत निविदा समिती समोर उघडण्यात येईल. निविदा सादर करताना वाहतूकीचे दर प्रती कि.मी. असावा. निविदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार निविदा समितीकडे राखून ठेवले असून निवड समितीचा निर्णय अंतिम राहिल. जिल्ह्यातील सर्व मिनीट्रक वाहतुक धारांकानी द्रवनत्र व द्रवनत्रपात्रे वाहतूकीसाठी निविदा विहित मुदतीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. जगदीश बूकतरे यांनी केले आहे.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ