शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु


           अकोला,दि.2(जिमाका)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, मित्र नगर, अकोला व मागासवर्गीय तथा आर्थिक दृष्ट्या मागावर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, पोपटखेड रोड,अकोट जि.अकोला येथे इयत्ता आठवी ते वरिष्ठ महाविद्यालय वसतीगृहात रिक्त जागेनुसार प्रवेश अर्ज घेणे चालू आहे. इच्छुक अनु.जाती, जमाती, विजाभज, विशेष मागास प्रवर्ग, अपंग आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता अर्ज करावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम