12 जूनला बाल कामगार विरोधी दिवस; 14 वर्षाखालील बालकास कामावर ठेवू नये:कामगार विभागाचे आवाहन


अकोला दि.9(जिमाका)- राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशानुसार 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी यांनी सर्व दुकाने, हॉटेल्स,  व्यापारी संस्था व कारखाने मालक यांनी 14 वर्षाखालील बालकास तसेच धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेशी संबंधीत उद्योग मालकांनी 18 वर्षाखालील किशोरवयीन कामगारास कामावर कामावर ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राहुल काळे यांनी केले आहे.

उद्योग व व्यवसायात कार्यरत कामगार संघटना, एन.जी.ओ. अथवा देशाचा कोणताही नागरीकांनी नोंद घेऊन बालकामगार/किशोरवयीन काम करताना आढळल्यास नजिकच्या पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदवावी, असे कळविण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ