तेल्हारा तालुक्यात अंगणवाडी मदतनीस भरती

 अकोला, दि.२७(जिमाका)- एकात्मिक बालविकास सेवा योजना तेल्हारा अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्त्वावरील ५३ पदांची  भरती  राबविण्यात येत आहे. याबाबतचा जाहिरनामा दि.२६ जून रोजी जारी करण्यात आला आहे,असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना तेल्हारा यांनी कळविले आहे. या भरती प्रक्रियेत  अडगाव मंडलातील ६, हिवरखेड-१ मधील ११, पंचगव्हाण -११, दानापूर-८, दहिगाव-४, हिवरखेड-२-१३, याप्रमाणे पदांची भरती होणार आहे. ज्या ज्या गावातील पदांची भरती होणार आहे, तेथे दवंडीद्वारे  सुचना देण्यात येत आहे. इच्छुक पात्र महिलांनी आपले अर्ज एकात्मिक बालविकास सेवा योजना, तेल्हारा, योगेश्वर कॉलनी, पंचायत समिती, तेल्हारा समोर, तेल्हारा येथे दि.३ ते १४ जुलै दरम्यान जमा करावे.

पात्रता व निकषः अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण (गुणपत्रक जोडावे) स्थानिक रहिवासी असणे आवश्यक (रहिवासी दाखला जोडावा.) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.  लहान कुटुंबाची अट. विधवा, अनाथ मुली, अनु जाती, जमाती, इतर मागासवर्गीय उमेदवारांना तसेच अंगणवाडी मदतनीस पदावर  किमान दोन वर्षाचा शासकीय अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक महिला उमेदवारांनी आपले अर्ज  दि.३ ते १४ जुलै दरम्यान जमा करावे. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार आहेत. या पदभरतीबाबत कुणाच्या भुलथापांना वा अमिषास बळी पडू नये, असे आवाहन  श्रीमती वैशाली बोदडे प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी तेल्हारा यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ