जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२४ साठी ऑनलाईन अर्ज

 अकोला, दि.२८(जिमाका)-जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२४ साठी विद्यार्थ्याचे आधार कार्ड संलग्न करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत, अशी माहिती प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी कळविली आहे.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२४ इयत्ता ५ वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. विद्यार्थी व पालक अकोला जिल्ह्यातील रहिवासी असावा. ऑनलाईन प्रवेश अर्ज विनामूल्य आहेत. ऑनलाईन अर्ज अपलोड करतांना विद्यार्थ्याचा फोटो (जेपीजी फाईल स्वरुपात) पालकाची सही (स्कॅन करुन) द्यावे. इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा विहित नमुन्यातील सर्टिफिकेट (स्कॅन कॉपी) जोडावे. प्रवेश अर्ज भरुन दि.१० ऑगस्ट पर्यंत अपलोड करावा. प्रवेश परीक्षा दि.२० जानेवारी २०२४ होणार आहे. प्रवेश अर्ज अपलोड करण्यासाठी  https://cbseitms.rcil.gov.in   किंवा www.navodaya.gov.in या लिंकवर संपर्क करावे,असे आवाहन प्राचार्य आर.एस. चंदनशिवे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ