दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार; 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले


अकोला, दि.22(जिमाका)- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या व्यक्तीसाठी राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करिता नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. गृह कामकाज मंत्रालयाच्या www.award.gov.in या केंद्रीकृत पोर्टलवर दि. 31 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 साठी अर्ज, नामांकने करताना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती, उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोष्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थेळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ