कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) येथे तंत्रज्ञान समन्वयक पदासाठी गुरुवारी(दि.8) मुलाखत


            अकोला दि. 1 (जिमाका)- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प 2023-24 अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), अकोला येथे तंत्रज्ञान समन्वयक या पदासाठी कंत्राटी तत्वावर नियुक्ती करावयाची आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी गुरुवार दि. 8 जून रोजी दुपारी 1 वाजता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, नेहरु पार्क जवळ, अकोला येथे कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

             कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), अकोला येथे सन 2023-24 या कालावधीकरिता तंत्रज्ञान समन्वयक पदासाठी कंत्राटी तत्वावर 30 हजार रुपये मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यापदाकरिता पदव्युत्तर कृषी व तत्सम पदवीधारक शैक्षणिक पात्रतांसह कृषी क्षेत्रातील विस्तार/संशोधन कामाचा किमान दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येतांना मुळ कागदपत्रे तसेच साक्षांकीत झेरॉक्स दोन प्रतीत व रंगीत पासपोर्ट साईझ फोटो चार प्रतीत सोबत आणावे. कागद पडताळणी मुलाखतीच्या दिवशी दि. 8 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत होईल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत होईल.

            उमेदवारास मुलाखतीसाठी येण्याचा प्रवास खर्च व भत्ता मिळणार नाही. नियुक्ती संदर्भात बदल करण्याचे, रद्द करण्याचे अधिकार प्रकल्प संचालक, आत्मा अकोला यांनी राखुन ठेवले आहेत. ही निवड तात्पुरत्या स्वरुपात माहे मार्च 2024 अखेरपर्यंत राहिल. निवड केल्यानंतर शासन सेवेत हक्क राहणार नाही याचा 100 रुपये स्टॅम्प पेपरवर बॉन्ड लिहुन द्यावा लागेल. अकोला जिल्ह्यातील स्थानिक गावांतील पोकरा योजनेत निवडलेल्या उमेदवारांना प्राधान्याने निवडले जाईल, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ