महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ; अनुसूचीत जातीच्या लाभार्थ्यांसाठी कर्ज योजना: अर्ज मागविले


अकोला, दि. 13(जिमाका)- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थीक वर्षासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध संवार्गातील लाभार्थ्यांसाठी कर्ज व अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थपक सुरेंद्र सावलीकर यांनी केले आहे.

 योजनेतंर्गत 200 लाभार्थ्यांना भौतीक व आर्थीक  उद्दिष्ट तसेच प्रशिक्षण योजनेअंतर्गत 400 प्रशिक्षणाचे उद्दीष्ट प्राप्त आहे. त्यानुसार अनुसूचीत जाती/नवबौध्द संवर्गातील लाभार्थ्यांनी कर्ज/अनुदानाकरीता अर्ज करावा. अर्जासोबत जातीचे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, दरपत्रक,  प्रशिक्षण घेवू इच्छीणाऱ्या पात्र व्यक्तींनी शैक्षणीक खंड प्रमाणपत्रासह कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. योजनेचा अर्ज महामंडळाचे जिल्हा कार्यालय, C/O डि. के. साठे, मोहन भाजी भंडार चौक, तापडीया नगर अकोला येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ