जलयुक्त शिवार अभियान २.० गाव आराखड्यास मान्यता; १३१ गावांमध्ये १३१ कोटी ७० लाख रुपयांची कामे प्रस्तावित



अकोला, दि.२२(जिमाका)- जलयुक्त शिवार अभियान २.० साठी जिल्ह्यात १३१ गावांमध्ये जलसंधारण उपचाराची कामे प्रस्तावित करण्यात आली असून जिल्हास्तरीय समितीने १३१ गावांमधील १६७४ कामांच्या गाव आराखड्यास मान्यता दिली आहे. याअंतर्गत १३१ कोटी ७० लक्ष ५४ हजार रुपये निधीतून जलसंधारण उपचाराची कामे होणार आहेत.

या कामांची अंदाजपत्रके तयार करुन तात्काळ प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया राबवावी,अशा सुचना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यंत्रणेस दिल्या, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी कळविले आहे.

या आराखड्यानुसार तालुकानिहाय घेण्यात आलेली कामे याप्रमाणे-(कंसात कामाची अंदाजित रक्कम रुपये)

अकोला- गावांची संख्या-१७, कामांची संख्या १९३,अंमलबजावणी यंत्रणा-मृद व जलसंधारण उपविभाग, जि.प. लपा. उपविभाग, वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग, तालुका कृषी अधिकारी अकोला (१६ कोटी ९२ लाख ३१ हजार रुपये),

बार्शीटाकळी- गावांची संख्या-१९,कामांची संख्या-३६२,अंमलबजावणी यंत्रणा-मृद व जलसंधारण उपविभाग, जि.प. ल.पा. उपविभाग बार्शी टाकळी, वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग, तालुका कृषी अधिकारी बार्शीटाकळी (१८ कोटी ६८ लाख ६० हजार रुपये)

अकोट-गावांची संख्या-२२, कामांची संख्या- ६७,अंमलबजावणी यंत्रणा- मृद व जलसंधारण उपविभाग अकोट, जि.प. ल.पा. उपविभाग अकोट (२५ कोटी ८० लाख रुपये)

तेल्हारा- गावांची संख्या-२५, कामांची संख्या-२००,अंमलबजावणी यंत्रणा-  मृद व जलसंधारण उपविभाग अकोट, जि.प. लपा. उपविभाग अकोट (३३ कोटी ५५ लाख ८० हजार रुपये)

मुर्तिजापूर- गावांची संख्या-२७,कामांची संख्या- ४१६,अंमलबजावणी यंत्रणा- मृद व जलसंधारण उपविभाग मुर्तिजापूर, जि.प. ल.पा. उपविभाग मुर्तिजापूर , तालुका कृषी अधिकारी मुर्तिजापूर, उपविभागीय अधिकारी लघु पाटबंधारे उपविभाग क्रमांक २ अकोला (१५ कोटी ४२ लाख १९ हजार रुपये)

बाळापूर- गावांची संख्या-८, कामांची संख्या-१३३, अंमलबजावणी यंत्रणा- मृद व जलसंधारण उपविभाग बाळापूर, जि.प.ल. पा. उपविभाग बाळापूर, तालुका कृषी अधिकारी बाळापूर (७ कोटी ४० लाख २७ हजार रुपये)

पातूर-गावांची संख्या-१३, कामांची संख्या- ३०३, अंमलबजावणी यंत्रणा- मृद व जलसंधारण उपविभाग बाळापूर, जि.प.ल. पा. उपविभाग बाळापूर, वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग,पातूर, वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग आलेगाव, तालुका कृषी अधिकारी पातूर (१३ कोटी ९१ लाख ३७ हजार रुपये)

यंत्रणा निहाय कामांची संख्या व रक्कम याप्रमाणे-

मृद व जलसंधारण विभाग-कामांची संख्या १०५०- रक्कम ९६ कोटी ४० लक्ष ७८ हजार रुपये.

जि.प.ल. पा. उपविभाग- कामांची संख्या १९५- रक्कम २७ कोटी ३५ लक्ष ३ हजार रुपये.

उपवनसंरक्षक वन विभाग- कामांची संख्या ६०- रक्कम ३ कोटी ५५ लक्ष ६८ हजार रुपये.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी- कामांची संख्या- ३६६- रक्कम ४ कोटी २ लक्ष ७८ हजार रुपये.

 कार्यकारी अभियंता ल.पा.- कामांची संख्या-३- रक्कम ३६ लक्ष रुपये.

असे एकूण १३१ गावांमध्ये १६७४ कामे प्रस्तावित असून त्याची किंमत १३१ कोटी ७० लक्ष ५४ हजार रुपये इतकी आहे. या सर्व आराखड्यास जिल्हास्तरीय समितीने मंजुरी प्रदान केली आहे,असे जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी कळविले आहे.

अशी आहे जिल्हास्तरीय समितीः- अध्यक्ष – जिल्हाधिकारी, सदस्य सचिव- जिल्हा जलसंधारण अधिकारी (मृद व जलसंधारण विभाग), सदस्य- जिल्हा जलसंधारण अधिकारी (लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद), उपविभागीय अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी(मृद व जलसंधारण उपविभाग बाळापूर, मुर्तिजापूर, अकोला, अकोट, सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी (जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद) शाखा अभियंता( जि.प. ल.पा. उपविभाग पातूर, अकोला)

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ