दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजना;अर्ज मागविले


अकोला, दि. 13(जिमाका)- दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थीक वर्षासाठी दिव्यांग कर्ज योजना राबवित आहे. या कर्ज योजनाअंतर्गत 200 दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी इच्छुक पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे.

  महामंडळाच्या दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजनांतर्गत 100 तसेच वैयक्तीक थेट कर्ज योजनामध्ये 100 असे एकूण 200 दिव्यांगाना कर्ज योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. कर्ज योजनेचे अर्ज महामंडळाचे जिल्हा कार्यालय, C/O डी. के. साठे, मोहन भाजी भंडार चौक, तापडीया नगर अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ