प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ई-केवायसी व आधार संलग्नता शिबीर

 अकोला, दि.२०(जिमाका)- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीतील १४ व्या हत्याच्या लाभ वितरणाची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्यासाठी लाभार्थ्यांचे ई-केवायसी व बॅंक खात्याशी आधार संलग्नता करण्यासाठी मंगळवार दि.२० व बुधवार दि.२१ रोजी जिल्ह्यात एकाच वेळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायं. साडेसहा यावेळात  हे शिबीर होणार आहेत. यासाठी गावपातळीवर  कृषी सहाय्यकांकडे याद्या देण्यात आल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांचे ई केवायसी व आधार संलग्नता अद्याप झालेले नाही अशा लाभार्थ्यांनी  सामाईक सुविधा केंद्र, इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक येथे जाऊन आपले  ई- केवायसी व आधार संलग्नता करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम