मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर; मतदारांनी मतदान यादीत नाव नोंदवावी


अकोला, दि. 12(जिमाका)-भारत निवडणूक आयोगाने यादीचा दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार नोंदणीसाठी पात्र असलेल्या नवीन व पात्र मतदारांनी मतदान यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

 संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम याप्रमाणे :

पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारुप मतदान यादी मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात येईल. दावे व हरकती दिनांक 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत स्विकारले जाईल. मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. शुक्रवार दि. 5 जानेवारी रोजी मतदार यादी अंतीम प्रसिध्द करण्यात येईल.

जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) यांचेकडे आवश्यक फॉर्म करुन देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुद्धा या मोहिमेत होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नव व पात्र  मतदार यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने www.nvsp या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव नोंदविता येईल. तसेच मतदारांना ऑफलाईन पद्धतीने आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी केले.

00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ