डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या पदवीदान समारंभ सभागृहात आज (दि.२१) साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग दिन


अकोला, दि.२०(जिमाका)- येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या पदवीदान समारंभ सभागृहात बुधवार दि.२१ रोजी सकाळी ७ वा. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,नेहरु युवा केंद्र, पोलीस प्रशिक्षण केंद्र,  एन.सी.सी. पतंजली योग समिती, योग भारती, क्रीडा भारती, इंडियन मेडिकल असोसिएशन,अकोला योग परिषद,  योगासन व सांस्कृतिक मंडळ, प्रजापिता ब्रह्मकुमार इश्वरीय विश्वविद्यालय,  संत निरंकारी मंडळ अशा विविध संस्था, संघटना या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.  सहभागाचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिषचंद्र भट यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ