मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

 अकोला, दि.१६(जिमाका)- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर  आधारीत अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मतदारांनी नावे नोंदविणे, वगळणे, केंद्र बदल इ.  कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देऊन करता येतील अथवा ऑनलाईन पद्धतीने करता येतील असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

पुनरिक्षण कार्यक्रम याप्रमाणे-शुक्रवार दि.२१ जुलै ते सोमवार दि.२१ ऑगस्ट  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी / पडताळणी. मंगळवार दि.२२ ऑगस्ट ते शुक्रवार दि.२९ सप्टेंबर  मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, मतदान यादी, मतदान ओळखपत्रातील त्रुटींची दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे प्रतिमांची गुणवत्ता सुधारणा करणे, विभाग/ यादी भाग तयार करणे. मतदान केंद्राच्या सिमा निश्चित करणे, त्यांना मान्यता प्राप्त करुन घेणे, नियंत्रण तक्ता अद्यावत करणे, शनिवार दि.३० सप्टेंबर ते सोमवार दि.१६ ऑक्टोबर नमुना १ ते ८ तयार करणे, दि.१ एप्रिल २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरक व एकात्मिक प्रारुप मतदार यादी तयार करणे, मंगळवार दि.१७ ऑक्टोबर एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, मंगळवार दि.१७ ऑक्टोबर ते गुरुवार दि.३० नोव्हेंबर दावे हरकती स्विकारण्याचा कालावधी, विशेष मोहिमा ह्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या दिवसांना आयोजीत होतील. मंगळवार दि.२० डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे, बुधवार दि.२६ डिसेंबर मतदार यादी छपाईसाठी आयोगाची परवानगी घेणे, सोमवार दि.१ जानेवारी २०२४  अंतिम मतदार यादीचे मुद्रण, शुक्रवार दि.५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ