डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आपात्कालीन पीक नियोजन शिफारसी

 अकोला, दि. 28(जिमाका)- पाऊस आगमन विलंबाच्या पार्श्वभुमिवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी आपात्कालीन पीक नियोजनाबाबत शिफारसी शेतकऱ्यांसाठी जारी केल्या आहेत.  या शिफारशींनुसार, दि.२ ते १५ जुलै दरम्यान पावसाचे आगमन  कालावधीत-

कापूस पिकासाठी अमेरिकन तसेच देशी कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. साधारणतः २० टक्के जादा बियाणे वापरावे. सुधारीत व संकरीत वाणांच्या बाबतीत दोन झाडांमधील अंतर कमी करावे. मुग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपिक म्हणून आंतर्भाव करावा. कापूस- ज्वारी- तूर- ज्वारी या त्रिस्तरीय आंतरपिक पद्धतीचा (सहाःएकःदोनःएक) अवलंब करावा.

ज्वारी पिकासाठी संकरीत ज्वारीचा सी.एस.एच-९ किंवा सी.एस.एच-१४ वाण वापरावा२० ते २५ टक्के जादा बियाणे पेरणी करावी.

सोयाबीन पिकासाठी सोयाबीन टी.ए.एम.एस-३८, ती.ए.एमएस-९८-३१ किंवा जे.एस-३३५ या पैकी उपलब्ध वाण वापरावे. सोयाबीनच्या दोन, सहा किंवा नऊ ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरावी. मुग, उडीद, तूर नेहमीप्रमाणे पेरणी करावी.

विद्यापीठाने केलेल्या या शिफारशींचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ