पीक कर्जाचे नुतनीकरण दि.30 जूनपूर्वी करा -जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

 अकोला, दि. 28(जिमाका)- खरीप हंगाम सन २०२३-२४ या वर्षात शेतकऱ्यांनी दि.३० जून पुर्वी शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहिती नुसार,विविध बॅंकांकडून पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे. सन २०२३-२४ या वर्षात अकोला जिल्ह्यातील १,४७,९५० शेतकऱ्यांना १,२७,५०० लक्ष रुपये  खरीप पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. दि.२६ पर्यंत जिल्ह्यातील ७६,४८२ शेतकऱ्यांना ८०,२४० लक्ष रुपये खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमागणी अर्ज बॅंकांकडे दाखल करावे. आणि नुतनीकरणापासून दूर असलेल्या अशा शेतकऱ्यांनी दि.३० जुनपुर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी केले आहे.

खरीप पीक कर्ज वाटपाचे निर्धारीत उदिष्ट साध्य करण्यासाठी नवीन पीक कर्ज वाटप करणे तसेच पीक कर्ज वाढीसह नुतनीकरण करणे आवश्यक आहे. सर्व बॅंका पीक कर्ज वाटपासाठी गावोगावी शिबीरे घेत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या घरी जावून सुद्धा पीक कर्जाचे नुतनीकरण करण्याबाबत आवाहन करीत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अल्प मुदतीच्या पीक कर्जाची परतफेड ३६५ दिवसाच्या आत किंवा दरवर्षी दि.३० जून रोजी किंवा त्यापूर्वी केली पाहीजे. तेव्हाच हे शेतकरी रिझर्व्ह बॅकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्जाच्या रक्कमेत वाढ करण्यास पात्र ठरतात.

जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणि केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत प्रत्येकी ३ टक्के व्याज सवलत मिळते. पीक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण केल्यामुळे शेतकरी बॅंकांच्या इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात. तरी संबंधित शेतकऱ्यांनी दि.३० जुनपर्यंत पीक कर्जाचे नुतनीकरण करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ