औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुर्तिजापूर येथे प्रवेश देणे सुरु


अकोला, दि.22(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुर्तिजापूर येथे एक व दोन वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरु झाले आहे. दहावी पास विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एस.पी. भगत यांनी केले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑगस्ट-2023 करीता एक व दोन वर्षाचे ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मॉटोलाफजी, ब्युटी पार्लर, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामींग असिस्टंट(कोपा), वेल्डर, इलेक्ट्रानिक्स मेकनिक, इलेक्ट्रीयशीयन, मोटर मेकॅनिक व्हेईकल या व्यवसायाकरिता जागा उपलब्ध आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ