पातूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्न






अकोला, दि.१(जिमाका)- तहसील कार्यालय,पंचायत समिती व एकात्मीक बालविकास सेवा योजना प्रकल्प पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर मंगळवारी (दि.३०)श्री.संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृह पातुर येथे संपन्न झाले.

पंचायत समिती सभापती सौ.सुनिता टप्पे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून उदघाटन झाले. जि.प. उपाध्यक्ष सुनिल फाटकर, उपसभापती पं.स.पातुर इम्रानखान, जि.प.सदस्य अर्चना विष्णु डाबेराव, डॉ.निलेश उन्हाळे, उपविभागीय अधिकारी बाळापुर डॉ.रामेश्वर पुरी, तहसीलदार विजय खेडकर, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर रूद्रकार, अर्जुनराव टप्पे उपस्थित होते.

प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान राठोड यांनी केले. याप्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळ,लोक संचालीत साधन केंद्र, उमेद, कृषी विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागांतर्गत सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अभय केंद्र पातुर, संजय गांधी योजना विभाग, पंचायत समिती, एकात्मीक बाल विकास प्रकल्प पातुर,शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, नगरपरीषद पातुर, चाईल्ड लाईन इत्यादी विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या शिबीरामध्ये तालुक्यातील ३८६ महिलांनी सहभाग नोंदवीला. १३४ तकारी प्राप्त झाल्या त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाला वर्ग करण्यात आल्या. सूत्र संचालन हे वैशाली हाडोळे यांनी तर आभारप्रदर्शन आश्विन डाबेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती अरूणा बांगर, श्रीमती वैशाली हाडोळे, मो.आसीफ गुलाम नबी,प्रवीण पवार, श्रीमती अंजली भालतीलक,वसंता गाडगे व सर्व अंगणवाडी सेविका तसेच तहसिल कार्यालय, पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,अभय केंद्र पातुर चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ