प्रधानमंत्री किसान सन्मान योजना; ई-केवायसी व आधार सिंडीग नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन


अकोला, दि.19 (जिमाका)- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सन्माननिधी दिल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्याकरिता ई -केवायसी व आधार सिडींग पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने दि. 20 व 21 जून रोजी सकाळी 8 ते सायं. 6.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकाच वेळी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरांचा पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

            प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीतील 14 वा  हप्त्याचा लाभ वितरणाची कार्यवाही सुरू आहे.याकरीता लाभार्थीने ई-केवायसी व बँक खाते आधार सलग्न करणे आवश्यक आहे. ई-केवायसी व बँक खाते आधार सलग्न  करण्याकरिता गाव पातळीवर जिल्ह्यात एकाच वेळी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी प्रलंबित लाभर्थ्यांची ई-केवायसी व आधार सिडींग पूर्ण करून घेण्याकरिता आपल्या गावातील कृषि सहायकाकडे याद्या उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याकरीता संबंधित कृषि सहायक, सामाईक सुविधा केंद्र, इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांची मदत घ्यावी.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ