राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ; एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


             अकोला दि.1(जिमाका)- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत यांच्याकडून कर्ज घेतलेल्या थकबाकीदारांना कर्ज परतफेड करता यावी यासाठी एकरकमी परतावा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना दि.31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी  लाभ घ्यावा व कर्जमुक्त व्हावे,असे आवाहन महामंडळाचे अकोला जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ