वाडेगाव येथील बियाणे महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; महागडे बियाणे टाळा, घरगुती बियाणे वापरा





अकोला,दि.6(जिमाका)- शेतकऱ्यांनी तयार केलेले शुद्ध व उत्कृष्ट दर्जाचे बियाणे वाजवी दरात मिळावे याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार,वाडेगाव ता. बाळापूर येथे बियाणे महोत्सव आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यानी महागडे बियाणे टाळून घरगुती बियाणे वापरावी किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांजवळून बियाणे खरेदी करुन शेतकऱ्यांचा फायद्या करत बियांण्यावरील खर्च वाचवावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश ठाकरे यांनी केले.

एकीकडे बाजारात वाढलेल्या बियाणांच्या किंमतीमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार केलेले शुद्ध व उत्कृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना महोत्सवात वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यात आले होते. महोत्सव कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नेते तथा प्रगतिशील शेतकरी उमेशआप्पा भुसारी, जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षा वजीरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय कराळे, ज्ञानेश्वर माळी,गजानन वजिरे, पंचायत समिती सदस्य अनंता काळे, बाळूभाऊ हिरेकर, कुरेशी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी संचालक गणेश कंडारकर,सरपंच आनंदा पाटोडे, प्रल्हाद गोतमारे,माजी सभापती विश्वासराव खुळे, कृषी अधिकारी अरुण मुंदडा, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ.गजानन लांडे, पोक्रा प्रकल्पाचे समन्वक गोपाल बोंडे,तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव जाधव,आत्मा यंत्रणाचे तालुका तंत्र व्यवस्थापक विजय शेगोकार, बाजार समितीचे सचिव कैलास नावकार यांची उपस्थिती होती.

  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश ठाकरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पूर्वीच्या काळी शेतकरी बांधव घरगुती बियाणे पेरणी करुन चांगले उत्पन्न घ्यायचे. त्यामुळे बियांण्यावर अत्यंत कमी प्रमाणात खर्च व्हायचा. परंतु आता शेतकरी बांधव महागडी बियाणे खरेदी करून बियांण्यावर मोठया प्रमाणात खर्च करतात. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरावे किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांजवळून बियाणे खरेदी करुन त्या शेतकऱ्यांचे फायदा करुन बियांण्यावरील खर्च वाचवावा. बियाणे महोत्सव उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नवीन दिशा मिळाली़ असून त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.

शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामात बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. तसेच सोयाबीन, कपाशी, तूर,उडीद पिकांचे एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन याविषयी तांत्रिक मार्गदर्शन कृषी विद्यापीठाचे डॉ.लांडे यांनी केले. त्यानंतर शिवाजी  जाधव यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. बियाणे,रासायनिक खते औषधे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. महोत्सवाला बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला असून विद्यापीठाचे विविध सुधारीत वाण सोयाबीन,तूर, मूग, उडीद ठेवण्यात आले होते. या बियाणे महोत्सवामधून 83 क्विंटल बियाण्याची विक्री करण्यात आली. महोत्सावामध्ये उत्कृष्ट शेतकरी म्हणून बटवाडी येथील उमेशआप्पा भुसारी व पारस श्रीकृष्ण लांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.  बियाणे महोत्सव यशस्वी होण्यासाठी कृषी पर्यवेक्षक बबीता बोळे, रवी धनभर, कृषी सहाय्यक गोपाल राऊत,उद्धव धुमाळे,मनीष बाजड, अनुसया नीलखन, विजू भवरे, धनंजय मोरे, गजानन इंगळे तसेच पोक्राचे समुह सहाय्यक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व्हि.एम.शेगोकार यांनी तर आभार प्रदर्शन शिवाजी जाधव यांनी केले.

0000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ