ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग मुक्त अभियान राबवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच निर्देश



अकोला, दि.13 (जिमाका)-  केंद्र शासनाने 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंयायतीत क्षयरोग मुक्त उपक्रम राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत ‘क्षयरोग मुक्त पंचायत’ उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत एच.जे. परिहार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनीष शर्मा, डॉ. अलका बोराखडे, डॉ. श्वेता वर्षेकर,वसंत उन्हाळे तालुक्यातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी आदीची उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, क्षयरोग मुक्त पंचायत उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणानी समन्वयाने काम करावे. याकरीता नोडल अधिकार यांची नियुक्त करुन उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे. याकरिता ग्रामपंयातीचा सहभाग घ्यावा. तसेच क्षयरोग मुक्त पंचायत उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीना पुरस्कार दिल्या जाणार असून सर्व ग्रामपंचायतीने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.  

ग्रामपंचायत स्तरावर ‘ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त स्पर्धा’चे आयोजन

क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ‘ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त स्पर्धा’ राबविण्यात येत आहे. पंचायत राज संस्थांना सक्षम करणे, क्षयरोगाशी निगडित समस्यांचे निराकरण करणे व क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत सर्वच ग्रामपंचायतींना सहभागी व्हायचे आहे. जे ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये वर्षभरात किमान एक ते दोन क्षयरुग्ण असतील अशा ग्रामपंचायतीची निवड करुन जागतिक क्षयरोग दिनी(24 मार्च) जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल. तसेच टीबी मुक्त पंचायत हा उपक्रम पंचायत विकास योजनामध्ये समाविष्ट केला जाईल. याकरिता ज्या ग्रामपंचायतीचे लोकसंख्या एक हजार आहे, अशा ठिकाणी कमीत कमी 50 संशयित व्यक्तींचे स्पुटम घेऊन तपासलेले असावे. तसेच सर्व रुग्णांना निक्षय पोषण योजनेचा लाभ दिला जाणे अपेक्षित राहिल, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनीष शर्मा यांनी दिली.  

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ