जिल्हा परिषद;उपकर योजनेसाठी शेतकऱ्यांकडून 5 जुलैपर्यंत अर्ज मागविले


            अकोला,दि.14(जिमाका)- जिल्हा परिषद उपकर योजना(संसफंड) सन 2023-24 अंतर्गत सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दि. 5 जुलैपर्यंत पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी संजय चांदुरकर यांनी केले आहे.

            सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर एचडिपीई पाईप पुरविणे, सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोयाबीन स्वच्छ करण्याकरिता स्पायरल सेपरेटर किंवा ग्रेडर पुरविणे,  सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्प्रेअर पुरविणे व सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर प्लॉस्टीक ताडपत्रि 450 जि.एस.एस. पुरविणे इत्यादी योजना जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत राबविण्यात येतात. योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी किंवा कृषी विभागांशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ