आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा











अकोला, दि.21(जिमाका)- आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला. यात शासकीय, निम्म शासकीय, औद्योगिक प्रशक्षिण संस्था, सेवाभावी तसेच आरोग्य,क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी सहभाग घेतला. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पुरुष महिला अशा समाजातील विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नेहरु युवा केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, योग भारती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व विविध योग संघटनेच्या संयुक्त वतीने नववा आंतरराष्ट्रीय योग दिन आज (दि.21) आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या दीक्षांत समारंभ सभागृह येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, पोलिस अधिक्षक संदिप घुगे व जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी योग दिनाबाबत उपस्थितांना  मार्गदर्शन केले. तसेच योग कार्यक्रमात कृषी विद्यापीठचे अधिष्ठाता डॉ. श्याम सुंदर माने, कुसचिव एस.आर.काळबांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, विद्यार्थी कल्याण अधिकारी  संदिप हाडोळे,योगासन मंडळाचे डॉ.सतीश उटागंळे, पंतजली योग समितीचे सदस्य हरीष बनवारीलाल पारवाणी, विविध महिला प्रशिक्षणार्थी, अजिंक्य फिटनेस पार्क, पंतजली योग समिती, नेहरु युवा केंद्र, पोलीस प्रशिक्षण केंद्र, इडियन रेडक्रॉस सोसायटी, योग परिषद, योगासन व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य, नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी होवून योग दिन साजरा केला.

आयटीआय(मुलींची) येथे योग दिन साजरा

 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) अकोला येथे जागतिक योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले.  योगा प्रशिक्षिक राधा काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या प्रशिक्षणार्थी मुलींना योगा संदर्भातील धडे आणि प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे, गटनिदेशिका रेखा रोडगे, शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर, प्रशांत बोकाडे, शिल्पनिदेशिका बबीता बोदडे, प्राजक्ता डांगटे, किशोरी फुके, मनोरमा भारसाकळे, सोनल कुलकर्णी, वीणा लाड, मयुरी बासोडे तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांनी यामध्ये सहभाग घेतला.

आखातवाडा अमृत सरोवर येथे योग दिन साजरा

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मीती करण्यात आले. या अमृत सरोवरां स्थळी योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केंद्र शासन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्तांनी केले होते. त्याअनुषंगाने आज अकोला तालुक्यातील आखातवाडा येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ